मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याविरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल प्रशांत रामकृष्ण येनगे (वय ३५, रा. कामगार चौकाजवळ, केशवानंदनगर) यांच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येनगे हे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

३० जुलै रोजी मावळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत कदम यांना येनगे यांच्या फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट आढळली. या पोस्टमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असे लक्षात आल्यानंतर कदम यांनी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे, संजय गायके आणि राहुल मते यांना सोबत घेऊन मुकुंदवाडी पोलीस स्टेशन गाठले. तक्रारीनुसार, प्रशांत येनगे यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पीएसआय डाके करीत आहेत. समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,242 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क