अथर एनर्जी, टोयोटा, जेएसडब्ल्यू मोबिलिटी, आणि लुब्रिझोल यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांनी बिडकीन औद्योगिक पट्ट्यात उद्योग उभारण्याची घोषणा केली होती. आता या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात अमेरिकेची एक मोठी आयटी कंपनी येण्याची माहिती समोर आली आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए)च्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
या कंपनीच्या स्थापनेमुळे सुमारे दोन हजार तरुणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हे रोजगार क्षेत्रामध्ये मोठा बदल घडवून आणतील आणि मराठवाड्यातील तरुणांसाठी नवे मार्ग खुले करतील. ऑरिक सिटीच्या औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळणार असून, या क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*