रस्त्यावरील ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी आवश्यक सूचनेचा बोर्ड व बॅरिकेड्स न लावणाऱ्या ठेकेदारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी झालेल्या नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २२ जुलै रोजी रात्री जगन्नाथ बाबुराव कुलकर्णी (वय ३९, रा. नारेगाव) आणि त्यांचा १० वर्षीय मुलगा सोहम दुचाकीवरून घरी जात असताना लुपिन कंपनीच्या कॉर्नरजवळ ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी पडली. यात दोघे गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर नागरिकांनी मदतीला धावून जखमींना रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर जगन्नाथ कुलकर्णी यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार पंडित चव्हाण करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

953 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क