शहरातील विविध चौक आणि सिग्नलवर आक्षेपार्ह इशारे करुन भीक मागणाऱ्या चार तृतीयपंथीयांवर अखेर जिन्सी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींची नावे अमृता जाधव निकिता (३८), सोफिया शेख आलिया शेख (२५), काव्या शेख आलिया शेख (२५), आणि संगिता शेख निकिता (२३) अशी आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात तृतीयपंथीयांकडून नागरिकांना पैसे मागणे, आक्षेपार्ह इशारे करणे आणि पैशांसाठी बळजबरी करण्याच्या प्रकारांत वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. नागरिकांकडून वारंवार कारवाईची मागणी होत होती. या संदर्भात पोलिस उपायुक्त नवनित काँवत यांनी लक्ष घालून जिन्सी पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
सोमवारी सायंकाळी निरीक्षक रामेश्वर गाडे आणि त्यांच्या पथकाने सेव्हनहील उड्डाणपूल परिसरात गस्त घातली असता, आरोपी आक्षेपार्ह पद्धतीने नागरिकांकडून भीक मागताना आढळले. त्यानुसार आरोपींवर कलम ४ मुंबई भिक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत १९५९ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*