शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. एकूण ३८ रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यात ३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १३ वर पोहचली आहे.
आज आढळलेल्या ३ रुग्णांपैकी २ पुरुष आणि १ स्त्री आहे. या परिस्थितीत, छत्रपती संभाजीनगरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोविड-19 चे रुग्ण शहरी भागात वाढत आहेत. मात्र, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
शहरातील आरोग्य विभागाने सर्व नागरीकांना मास्क वापरण्याचे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य विभागाने देखील लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र करण्याचे ठरवले आहे.
शहरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन स्वतःचे आणि इतरांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*