छत्रपती संभाजीनगर : शहरातील शिवाजीनगर-देवळाई दरम्यानचा भुयारी मार्ग आता अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे. शनिवारी (दि. ३०) रात्री अवघ्या पंधरा मिनिटांत या भुयारी मार्गात तब्बल २५ हून अधिक दुचाकी घसरून पडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री ८ ते ८.१५ या वेळेत घडलेल्या या प्रकारात काही वाहनचालकांना गंभीर दुखापती झाल्या असून, सुदैवाने मोठा अपघात टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरकडून देवळाईकडे आणि देवळाईहून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारावर सिमेंटचे स्पीड ब्रेकर आहेत. त्यामुळे वाहनांना कमी वेगात जावे लागते. मात्र, या भुयारी मार्गाचा दोन्ही बाजूने उतार असल्याने ब्रेक लावतच गाडी चालवावी लागते. त्यातच रस्त्यावर घसरट पृष्ठभाग असल्याने वाहनांचे संतुलन बिघडते.

शनिवारी झालेल्या प्रकारात वाहनचालकांनी भुयारी मार्ग उतरताना गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र सिमेंटचा थर व ओलसर पृष्ठभागामुळे गाड्या घसरल्या. काहीजणांना पडताना किरकोळ ते गंभीर दुखापती झाल्या असून, अपघातानंतर वाहनधारकांनी मोठ्या दुर्घटनेपासून वाचण्यासाठी सतर्कता दाखवली. मागून येणाऱ्या वाहनचालकांनीही ब्रेक लावून धडक टाळली.

स्थानिक नागरिकांच्या मते, भुयारी मार्गावर योग्य देखभाल न केल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. सिमेंटचे स्पीड ब्रेकर, पावसाळ्यातील ओलसरपणा आणि उतार यामुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत आहे. तातडीने येथे रस्ता सुधारणा, स्लिपरोधक उपाययोजना आणि वाहतूक नियंत्रणाची गरज आहे.

या अपघातामुळे पुन्हा एकदा नागरी रचना आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर चर्चा रंगली असून, प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,772 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क