मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीस हादरवणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा मराठी मालिकांमधून तसेच ‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’, ‘बडे अच्छे लगते है’ या हिंदी मालिकांमधून दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी झुंज देत असतानाच तिने आज (रविवार) पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून प्रिया लाइमलाइटपासून दूर होती. सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती. तिच्या निधनाच्या बातमीने मराठी आणि हिंदी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. प्रिया शेवटची प्रेक्षकांच्या भेटीला ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत आली होती. मात्र ही मालिका तिने मधेच सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून तिने याबद्दल माहिती चाहत्यांना दिली होती आणि आरोग्याचं कारण सांगितलं होतं.

अभिनेत्री प्रिया मराठे ही तिच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखली जात होती. मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये समसमान यश मिळवणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींपैकी ती एक होती. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडली. तिच्या आकस्मिक जाण्याने केवळ तिचे चाहतेच नव्हे तर संपूर्ण कलाविश्व शोकाकुल झाले आहे.

प्रिया मराठे हिच्या निधनानंतर सोशल मीडियावर कलाकार आणि चाहत्यांकडून श्रद्धांजलीचा वर्षाव होत आहे. कर्करोगाशी लढताना तिने केलेली झुंज प्रेरणादायी असली तरी तिचे असे अचानक जाणे हे सर्वांसाठी मोठे दु:खद आहे. मराठी कलाविश्वातील हा मोठा पोकळी निर्माण करणारा क्षण आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,102 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क