छत्रपती संभाजीनगर : विभागाकडून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (दि.४) करण्यात आली. यंदा जिल्ह्यातील ९ प्राथमिक व ६ माध्यमिक अशा एकूण १५ शिक्षकांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. लवकरच समारंभपूर्वक या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील तब्बल २०९० शाळांमध्ये सुमारे नऊ हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवडक शिक्षकांना दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त गौरविण्यात येते. यंदाही त्याच परंपरेनुसार प्राथमिक विभागातून प्रत्येक तालुक्यातून एक अशा नऊ शिक्षकांची तर माध्यमिक विभागातून सहा शिक्षकांची निवड झाली आहे.

या पुरस्कारांसाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तालयाकडे सादर करण्यात आला होता. त्याला गुरुवारी मान्यता देण्यात आली असून निवड झालेल्या शिक्षकांची नावे आणि अनुषंगिक खर्चाला देखील मान्यता मिळाली आहे.

दरम्यान, शिक्षकदिनानिमित्त उद्या कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. मात्र निवड झालेल्या शिक्षकांचा लवकरच समारंभपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे या मानाच्या पुरस्काराने शिक्षक वर्गात समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.

पुरस्कारासाठी निवडलेले शिक्षक

प्राथमिकचे विभागातील शेख इब्राहीम (गाढेजळगाव), संजय बाहुले (पळसगाव), गीतांजली गजबे (उमरावती), छाया शिरसाट (मोढा खुर्द), विनोद महालपुरे (गोदेगाव), एकनाथ माळतकर (नागद), ज्योती निकम (सुदामवाडी), संदीप काळे (ममदापूर), सुमन बनसोडे (लिंबगाव) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

तर माध्यमिक विभागातील गोरखनाथ नजन (लाडसावंगी), संगीता बाबरेकर (फुलंब्री), गडू सपकाळ (पानवडोद बु), वनिता दयाटे (बोरसर), अमरसिंह चंदेल (तुर्काबाद) आणि कल्पना पैठणपगारे (पैठण) यांना आदर्श पुरस्कार जाहीर झाला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

786 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क