छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाच प्रमुख भागांना जोडणाऱ्या मकई गेटच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या २५ दिवसांत हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या मार्गावरील वाहतूक बंद होती. ऐतिहासिक दरवाजाचे संवर्धन व मजबुतीकरणाचे काम राज्य पुरातत्त्व विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.

मकई गेटची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. सज्ज्यावरचे दगड पडण्याच्या स्थितीत होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले. या गेटमधून जाणारा रस्ता बेगमपुरा, जयसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, विद्यापीठ परिसरासह किमान ५० हजार लोकांना जोडतो. दरम्यान, गेट बंद असल्यामुळे नागरिकांना बीबी का मकबरा, मुख्य बाजारपेठ आणि इतर भागात जाण्यासाठी नागसेनवन मार्गे तब्बल तीन किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत होता. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

या कामासाठी पारंपरिक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. सिमेंटऐवजी चुना, गूळ, दगड आणि उडीद डाळ यांचा वापर करून लांबी भरण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे काही काळ काम ठप्प झाले होते. मात्र आता सज्जा, दगड मजबुतीकरण व दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. २५ दिवसांत हा रस्ता खुला करण्याचे नियोजन असून त्यानंतर भडकल गेटच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वाहणे यांनी दिली.

शहरातील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा रस्ता पुन्हा खुला होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,232 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क