छत्रपती संभाजीनगर : राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस तब्बल १० लाख रुपयांचा निधी अदा केला आहे. हा धनादेश समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी (दि.१०) रात्री सुपूर्द करण्यात आला.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे वेतन देत मदत केली. याशिवाय सभापती पठाडे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता सर्व कार्यक्रम रद्द करत वाढदिवसासाठी होणारा खर्च वाचवून १,०९,०९१ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला. यावेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या भरीव मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना बाजार समितीच्या वतीने पारंपरिक बैलगाडी भेट देण्यात आली.

दरम्यान, पठाडे यांच्या वाढदिवसानिमित्त लाडसावंगी येथे सरपंच सुदाम पवार यांनी आयोजित केलेला सत्कार पठाडे यांनी नम्रपणे नाकारला. त्याऐवजी कपाशीचे जास्त उत्पादन घेणाऱ्या ५१ शेतकऱ्यांचा गौरव करून एक वेगळा आदर्श घालून दिला.

या कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक गणेश दहिहंडे, रामबाबा शेळके, दत्ताभाऊ दकिर्डे, मनोज गायके, प्रदीप दहिहंडे, बाळासाहेब पडुळ, रवी पडुळ, सरपंच रमेश शिंदे, उपसभापती आर्जुन शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

543 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क