छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिध्दार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील वयोवृद्ध बिबट मादी ‘रेणु’ (वय १६ वर्षे) हिचे आज पहाटे निधन झाले. मागील काही दिवसांपासून ती आजारी होती आणि तिच्यावर प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यक डॉ. निती सिंग यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र, वयोमानामुळे उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने आज रेणुचा मृत्यू झाला.

रेणु ही सन २०१५-१६ मध्ये आमटेज रेस्क्यू सेंटर, हेमलकसा, जिल्हा गडचिरोली येथून सिध्दार्थ उद्यानात आणण्यात आली होती. मागील दहा वर्षांपासून ती प्राणीसंग्रहालयात वास्तव्य करत होती. तिच्या निधनामुळे उद्यानातील कर्मचारी आणि प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

रेणुच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शासकीय पशुचिकीत्सालय, खडकेश्वर येथील डॉ. जयकुमार सातव आणि डॉ. संदीप राठोड यांनी केले. यावेळी वनविभागाचे अविनाश राठोड (वनपाल) आणि डी.एस. पवार (वनरक्षक) उपस्थित होते. पंचनामा करून रेणुचे पार्थिव सर्वांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राणीसंग्रहालय प्रशासनाने रेणुच्या मृत्यूबाबत सविस्तर अहवाल आयुक्त तथा प्रशासक, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांना सादर केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

884 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क