छत्रपती संभाजीनगर : शहरातील गणेश कॉलनी, रशिदपुरा, टीव्ही सेंटर रोड परिसरात शनिवारी दुपारी भूकंपाचे धक्के बसल्याची चर्चा वेगाने पसरली. सोशल मीडियावर भूकंप झाल्याची माहिती व्हायरल होताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. इतकेच नव्हे तर ही चर्चा मंत्रालयापर्यंत पोहोचल्याने प्रशासन सतर्क झाले. परंतु सायंकाळी प्रशासनाने अधिकृतरित्या स्पष्ट केले की, जिल्ह्यात कुठेही भूकंप झाल्याची नोंद नाही आणि ही सर्व अफवा होती.

दुपारच्या सुमारास काही नागरिकांना अचानक हलकासा कंप जाणवल्याचा अनुभव आला. त्यातून भूकंप झाल्याचा समज पसरत गेला. पाहता पाहता शहरातील विविध भागात ही माहिती चर्चेचा विषय बनली. मंत्रालयानेही तत्काळ फोनद्वारे जिल्हा प्रशासनाकडून चौकशी केली, त्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर गेले आणि माहिती संकलन सुरू झाले.

केंद्र सरकारच्या भूकंप मॉनिटरिंग अॅपवर, तसेच संबंधित यंत्रणांकडे तपासणी करण्यात आली. मात्र कुठेही भूकंपाची नोंद आढळली नाही. भूकंपाचा कोणताही सेन्सर सक्रिय नसल्याचेही स्पष्ट झाले. पुढे नाशिक येथील महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) कडूनही माहिती घेतली असता, त्यांनीही भूकंपाची कोणतीही नोंद नसल्याचे सांगितले. त्यामुळे अफवेचा फुगा सायंकाळी अखेर फुटला.

दरम्यान, ही अफवा नेमकी कुठून आणि कशी पसरली? याचा शोध प्रशासन घेत आहे. सोशल मीडियावरील बेजबाबदार माहिती प्रसारणावर प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे.

“भूकंपाचे धक्के जाणवल्याची चर्चा आमच्यापर्यंत आली होती. आम्ही सर्व स्तरावर पडताळणी केली. मात्र जिल्ह्यात कुठेही भूकंप झाल्याचे वृत्त नाही. ती निव्वळ अफवा होती.”

— जनार्धन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,100 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क