छत्रपती संभाजीनगर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जवाहरनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले व चोरीला गेलेले तब्बल २६ मोबाईल फोन मूळ मालकांना परत केले. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला असून, मोबाईल परत मिळालेल्या तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

शहरातील विविध भागांतून नागरिकांचे मोबाईल चोरीला जाणे किंवा हरविण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणांत जवाहरनगर पोलिस ठाण्यात चोरी व प्रॉपर्टी मिसिंगचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा सखोल तपास करत पोलिसांनी केंद्रीय दूरसंचार विभागाच्या CEIR पोर्टलचा तसेच मोबाईलच्या IMEI क्रमांकाचा प्रभावी वापर केला. या तांत्रिक तपासामुळे बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटकसह ठाणे, नांदेड आणि नाशिक येथून मोबाईल फोन ट्रेस करण्यात पोलिसांना यश आले.

तपासादरम्यान वेगवेगळ्या राज्यांतील संबंधित पोलिस यंत्रणांशी समन्वय साधून हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले. जप्त केलेल्या २६ मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे ५ लाख ६५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले.

या कारवाईनंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास विलंब न करता तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. वेळेत दिलेल्या तक्रारी आणि तांत्रिक साधनांच्या मदतीने मोबाईल परत मिळण्याची शक्यता अधिक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

482 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क