छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस शिपाई भरती २०२४–२५ अंतर्गत उमेदवारांच्या मैदानी चाचण्यांना आजपासून (दि. ११ फेब्रुवारी) अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया शहरातील गोकुळ पोलीस कवायत मैदान, एन–१० परिसरात राबविण्यात येत असून सकाळपासूनच उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

भरती प्रक्रियेपूर्वी सर्व तयारीचा सविस्तर आढावा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गौतम पातारे यांनी प्रत्यक्ष मैदानावर घेतला. यावेळी मैदानी चाचण्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था तपासण्यात आल्या.

भरती प्रक्रियेत १०० मीटर व १६०० मीटर धावणे, गोळाफेक, उंची व छाती मोजमाप अशा शारीरिक चाचण्या घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर उमेदवारांची RFID प्रणालीद्वारे उपस्थिती नोंद, बायोमेट्रिक नोंदणी तसेच संपूर्ण प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार टाळून भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी एकूण ५३ पदे उपलब्ध असून त्यासाठी तब्बल ४,३४१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने तरुण या मैदानी चाचण्यांमध्ये सहभागी होणार आहेत.

पोलीस प्रशासनाच्या वतीने उमेदवारांसाठी पिण्याच्या पाण्याची, प्राथमिक उपचारांची तसेच शिस्तबद्ध व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. भरती प्रक्रिया शांततेत आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आजपासून सुरू झालेल्या या मैदानी चाचण्यांमुळे जिल्ह्यातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांच्या पोलीस सेवेत जाण्याच्या स्वप्नाला आकार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

512 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क