छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धार्मिक भावनांना हात घालणारी एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी मंदिर अपवित्र झाल्याचा दावा करत गोमूत्र शिंपडून मंदिर स्वच्छ केल्याचा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, काल सकाळच्या सुमारास अब्दुल सत्तार मंदिरात पोहोचून त्यांनी शांततेत दर्शन घेतले. मात्र त्यांच्या दर्शनानंतर काही तरुणांनी आक्षेप नोंदवत, सत्तार हे मांसाहार केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत असा आरोप केला. अशा व्यक्तीने महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी मंदिरात प्रवेश करू नये, असे म्हणत त्यांनी मंदिर परिसरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्थानिक नागरिकांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारावर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. प्रशासनाकडूनही घटनेची नोंद घेण्यात येत असून, सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,789 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क