छत्रपती संभाजीनगर : ‘परिचय महिला बचत महासंघ’ व ‘ग्रो स्मार्ट रिटेल इंडिया प्रा. लि.’ या संस्थांच्या माध्यमातून महिलांना नोकरी व मोफत इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचे आमिष दाखवत तब्बल २२ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अन्विता योगेश काची, हर्षा विजय अंभोरे आणि हेमंत राजेश रसाळ यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी रोहिणी गजमल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२२ मध्ये आरोपींनी त्यांच्या घरी भेट देऊन महिलांना संस्थेचे सभासद होण्याचे आवाहन केले. सभासद नोंदणीसाठी प्रत्येकी १,५०० रुपये शुल्क घेण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या कार्यालयात १५ हजार रुपये मासिक पगाराची नोकरी आणि तीन महिन्यांत मोफत इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचे आश्वासन देण्यात आले. या आमिषाला बळी पडत फिर्यादीसह अनेक महिलांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रे आरोपींकडे सुपूर्द केली.

या कागदपत्रांचा तसेच मोबाइलवर आलेल्या ओटीपीचा गैरवापर करून आरोपींनी फिर्यादीच्या नावे गिरनार कॅपिटल प्रा. लि. या मायक्रो फायनान्स कंपनीकडून १ लाख ५१ हजार ९८० रुपयांचे कर्ज २२ टक्के व्याजदराने मंजूर करून घेतले. सुरुवातीचे काही हप्ते भरल्यानंतर कर्जफेड थांबविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

नोव्हेंबर २०२३ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी नावावर करण्यासाठी महिलांकडून सह्या घेण्यात आल्या. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी काहींना स्कूटर देण्यात आल्या; मात्र त्या जुन्या व नादुरुस्त अवस्थेत असल्याचे समोर आले. दरम्यान, बँकांकडून थकबाकीबाबत फोन येऊ लागल्याने महिलांना फसवणुकीची जाणीव झाली. संगीता साठे, वैशाली नाईक, सोनाली शिंदे, लक्ष्मी वैद्य, ज्योती वाघ, करुणा मगरे आदींसह १४ पेक्षा अधिक महिलांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

590 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क