युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रूसवर भारताचा ध्वज अभिमानाने फडकवण्यात आला आहे. संभाजीनगर येथील इंडियन कॅडेट फोर्स व श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे क्रीडा शिक्षक किशोर नावकर, तसेच सहकारी सुरज सुलाने, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे दत्ता सरोदे, उद्योजक डॉ. प्रशांत काळे, विनोद विभुते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावच्या रुपाली कचरे, मैसूरचे प्रीत अपय्या, लातूरचे अजय गायकवाड, मध्यप्रदेश येथील १२ वर्षीय प्रीती सिंग, चेतन परमार आणि एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी १७ ऑगस्ट रोजी शिखर सर केले.

 

मोहिमेचे धाडस आणि आव्हान

सोलापूरमधील 360 एक्सप्लोरर ग्रुपच्या नेतृत्वाखाली ही मोहिम आयोजित करण्यात आली होती. ९ ऑगस्टला सुरू झालेल्या या मोहिमेच्या दरम्यान, कठीण हवामान आणि वादळामुळे १५ ऑगस्टला नियोजित चढाई शक्य झाली नाही. मात्र, १६ ऑगस्टच्या मध्यरात्री मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आणि १७ ऑगस्टला सकाळी ६:४५ वाजता शिखरावर यशस्वीरित्या चढाई करण्यात आली.

माऊंट एल्ब्रूस: माहिती आणि आव्हाने

माऊंट एल्ब्रूस हे १८,५१० फूट उंच, युरोपातील सर्वोच्च शिखर असून रशियातील कॉकस पर्वतरांगेत वसलेले आहे. जॉर्जियाच्या सीमेजवळ असलेल्या या शिखरावर चढाई करणे अत्यंत कठीण मानले जाते. येथे कायमच वादळे आणि गोठवणारी थंडी असते. ही सर्व आव्हाने पार करत, भारतीय संघाने शिखर सर केले.

विशेष कामगिरी

१) किशोर नावकर यांनी “गर्ल्स कॅन डू एनीथिंग” या संदेशासह शिखर सर केले.

२) डॉ. प्रशांत काळे यांनी महाराष्ट्रीयन पोशाखात शिखरावर पोहोचले.

३) सुरज सुलाने हे तीन तासांत माऊंट एल्ब्रूस सर करणारे सर्वात वेगवान महाराष्ट्रीयन ठरले आहेत.

४) दत्ता सरोदे हे सर्व महानगरपालिकांमधून शिखर सर करणारे पहिले भारतीय आहेत.

५) मधुमेह असूनही विनोद विभुते यांनी शिखर सर केले.

६) रुपाली कचरे यांनी शिखराच्या पायथ्याशी महाराष्ट्रगीत सादर केले.

७) अजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती शिखरावर नेली.

८) चेतन परमार हे मोहिमेतील सर्वात लहान सदस्य होते.

९) प्रीत अपय्या या सर्वात ज्येष्ठ सदस्य होत्या.

१०) प्रीती सिंग ह्या शिखर सर करणाऱ्या मध्यप्रदेशातील सर्वात लहान मुलगी ठरल्या आहेत.

360 एक्सप्लोरर ग्रुपचे गौरवपूर्ण काम

360 एक्सप्लोरर ग्रुपने गेल्या आठ वर्षांत विविध साहसी मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. या ग्रुपने जगभरात अनेक साहसी मोहिमांचे आयोजन केले आहे आणि अनेक विश्वविक्रम आपल्या नावे केले आहेत.

टीमचे अभिनंदन

“टीम 360 एक्सप्लोररचे हे यश खूप मोठे आहे. युद्धजन्य देश रशियात जाऊन शिखर सर करणे धाडसाचे काम आहे,” असे इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांनी सांगितले. त्यांनी आणि अनेक मान्यवरांनी टीमचे अभिनंदन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

471 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क