छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या प्रक्रियेत एकूण ८० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीनंतर ५२ अर्ज पात्र ठरविण्यात आले असून, या पात्र उमेदवारांमधून अंतिम निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महापालिकेतील विद्यमान सदस्यसंख्येनुसार स्वीकृत नगरसेवकांचे वाटप ठरणार आहे. सर्वाधिक ५७ नगरसेवक असलेल्या भाजपला ५ स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत. एमआयएमकडे ३३ सदस्यसंख्या असल्याने त्यांना ३ जागा मिळतील. शिंदे गटाच्या शिवसेनेकडे १३ सदस्य असून त्यांना १ जागा मिळणार आहे, तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे ६ सदस्य असल्याने त्यांनाही १ स्वीकृत नगरसेवक निवडण्याची संधी मिळणार आहे.

एमआयएमकडून मोहमद असरार, शेख अहमद आणि कुणाल खरात यांची नावे जवळपास निश्चित मानली जात आहेत. दरम्यान, भाजपकडे सर्वाधिक इच्छुकांची संख्या असूनही अद्याप पक्षाने अधिकृत नावे जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

२० तारखेला सकाळी ११ वाजता सर्व पक्षांचे गटनेते आपापल्या उमेदवारांची अंतिम यादी थेट महापौरांकडे सादर करणार आहेत. त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभेत निवड प्रक्रिया पार पडेल. इतर पक्षही याच पद्धतीचा अवलंब करणार असल्याचे समजते. या निवड प्रक्रियेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

447 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क