छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागीय आयुक्तपदावर अखेर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली असून, गुरुवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले. विद्यमान आयुक्त जितेंद्र पापळकर यांची मुंबई येथे जीएसटी सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे प्रशासनात चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या १४ दिवसांपूर्वी म्हणजेच २ एप्रिल रोजी जी. श्रीकांत यांची महापालिका आयुक्तपदावरून बदली झाली होती. मात्र, अल्पावधीतच त्यांची पुन्हा शहरातच महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने हा निर्णय लक्षवेधी ठरला आहे. त्यांच्या पुनरागमनामुळे प्रशासनातील कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, याच आदेशात सिडकोचे मुख्य प्रशासक जगदीश मिणीयार यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली असून, सिडकोच्या मुख्य प्रशासकपदासाठी अद्याप नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आलेली नाही.

आपल्या बदलीबाबत प्रतिक्रिया देताना जितेंद्र पापळकर यांनी शासनाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. या सर्व फेरबदलांमुळे प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप झाले असून, येत्या काळात त्याचे परिणाम दिसून येणार आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,215 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क