छत्रपती संभाजीनगर: शहरात गुन्हेगारीच्या घटना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशी चाकू हल्ल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्रिमूर्ती चौक परिसरात भररस्त्यात एका ४० वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

संतोष लक्ष्मण ठोंबरे असे जखमी व्यक्तीचे नाव असून, त्यांच्यावर सुमित उर्फ भैय्या बाबासाहेब शेजवळ या तरुणाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात आरोपीने ठोंबरे यांच्यावर चाकूने सपासप वार केले, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत ठोंबरे यांना शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी सुमित शेजवळ याला अटक केली आहे.

मात्र, शहरात सलग चार दिवस अशा प्रकारचे हल्ले होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,088 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क