छत्रपती संभाजीनगर : शहरातील महत्त्वाकांक्षी ड्रेनेज प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामात विनाकारण अडथळा आणणाऱ्या नागरिकांना प्रथम समजावून सांगावे, मात्र त्यानंतरही विरोध कायम राहिल्यास संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘अमृत’ आणि ‘नगरोत्थान’ योजनेअंतर्गत तब्बल ८६१ कोटी रुपयांचा ड्रेनेज प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध झाला असून, महानगरपालिकेलाही ३० टक्के स्वहिस्सा उचलावा लागत आहे. शहरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, प्रकल्पाची आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे, सातारा-देवळाई परिसरात सुमारे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र, काही भागांमध्ये स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधामुळे कामांच्या गतीवर परिणाम होत आहे.

सातारा परिसरात शेतजमिनीतून ड्रेनेजलाइन टाकण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता. महसूल प्रशासनाने संबंधितांना कायदेशीर अधिकारांची माहिती दिल्यानंतर हा विरोध मागे घेण्यात आला आणि कामाला परवानगी मिळाली. तसेच राष्ट्रीय विधी विद्यापीठाकडे जाणाऱ्या डीपी रस्त्यावरील कामालाही विरोध झाला होता. प्रशासनाने चर्चा करून तोही प्रश्न सोडविला.

दरम्यान, मध्य विधानसभा मतदारसंघातील काही भागांतही कामांना विरोध होत असल्याने प्रशासनाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. विकासकामांमध्ये अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक तेथे कायदेशीर कारवाई करण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

471 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क