छत्रपती संभाजीनगर : महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल १६ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मिटमिटा परिसरातील देवगिरी व्हॅली येथे घडली असून, याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय काशीनाथ शेजवळ (रा. देवगिरी व्हॅली, मिटमिटा) हे निवृत्त तालुका आरोग्य पर्यवेक्षक असून ते पत्नी, दोन मुले, सून आणि पत्नीची बहीण यांच्यासह वास्तव्यास आहेत. शेजवळ कुटुंबीय २६ जून रोजी सकाळी महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान, २७ जून रोजी सकाळी त्यांचे शेजारी पवन देशमुख यांनी शेजवळ यांना फोन करून घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली.

ही माहिती मिळताच शेजवळ कुटुंबीय तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे परतले. घरी आल्यानंतर त्यांनी घराचे कुलूप तोडलेले आणि आतील कपाटे उघडून त्यातील ऐवज अस्ताव्यस्त केल्याचे पाहिले. चोरट्यांनी घरातील कपाटातून ३४.५२० ग्रॅमचे गंठण, दोन मिनी गंठण, दोन सोन्याच्या चेन, मंगळसूत्र, सोनसाखळी, तीन पेंडंट, कलकत्ता पेंडंट सेट, सहा सोन्याच्या अंगठ्या, कानातील सोन्याच्या रिंग, चांदीचे जोडवे व साखळी तसेच ३० हजार रुपयांची रोकड असा एकूण मोठा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,128 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क