छत्रपती संभाजीनगर : शहरातील वारकरी सेवा चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘माझा एक लाडू माझ्या पांडुरंगाला…’ हा सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडला. रविवारी (१९ जुलै) जालना रोडवरील पाटीदार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अवघ्या पाच तासांत तब्बल १ लाख ३० हजार उपवासासाठीचे गूळ-शेंगदाणा लाडू तयार करण्यात आले. यंदाचे हे या उपक्रमाचे १९ वे वर्ष असून, हजारो वारकरी आणि नागरिकांच्या सहभागामुळे पुन्हा एकदा सेवेचा अनोखा विक्रम नोंदविला गेला.

सकाळी १० वाजता लाडू बनविण्यास सुरुवात झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत शहराच्या विविध भागांतील अडीच ते तीन हजार महिला स्वयंप्रेरणेने या सेवाकार्यात सहभागी झाल्या. ‘श्रीपांडुरंग चरणी सेवा’ या भावनेतून प्रत्येक महिलेने आपल्या हाताने लाडू तयार करून वारकरी सेवेचा आनंद अनुभवला.

फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज सुर्वे यांनी सांगितले की, ‘माझा एक लाडू माझ्या पांडुरंगाला…’ हा उपक्रम केवळ प्रसाद वाटपाचा नसून, प्रत्येक वारकऱ्यामध्ये पांडुरंगाचे रूप पाहून सेवा करण्याची ही परंपरा आहे. सोमवारपासून (२० जुलै) वारी मार्गावरील दिंड्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना या लाडूंचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांपर्यंत हे लाडू पोहोचविण्यात येतील.

या सेवाभावी उपक्रमात शहरातील अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक तसेच दानशूर नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. नगरसेवक शंकर म्हात्रे, सुरेंद्र कुलकर्णी, नंदू गवळी, श्रीमती थोरात, जगन्नाथ गिते, जितेंद्र जैन, जितेंद्र चौरसिया, अर्जुन पवार, शारदा ताठे, ममता ताठे, घुगे यांच्यासह अनेकांनी या उपक्रमाला सहकार्य केले. वारकरी परंपरेतील सेवा, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम शहरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

415 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क