शहरातील कृष्णभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, यंदा ५३ ठिकाणी दहीहंडी फोडण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, ११ मंदिरांत कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यामुळे शहरात दुपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले असून, सहा प्रमुख चौकांतील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याचे पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी शहरात ४४ मंडळांनी दहीहंडी साजरी केली होती. यंदा मात्र ५३ मंडळांची नोंदणी झाली आहे. गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर, शहागंज, निराला बाजार, आणि गजानन महाराज मंदिर चौक येथे पारंपरिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी जवळपास १२ ते १५ हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
शहरवासीयांचे लक्ष यंदा कोणते गोविंदा पथक ८ किंवा ९ थर रचून मानाची दहीहंडी फोडतो, याकडे आहे. या विषयी नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.
चौकांना जुळणारे हे मार्ग बंद :
1. टीव्ही सेंटर चौक:साक्षी मंगल कार्यालय ते टीव्ही सेंटर चौक, हडको कॉर्नर, जिजाऊ चौक, आयपी मेस मार्ग बंद.
2. कॅनॉट प्लेस: कॅनॉट प्लेसकडे जाणारे सर्व मार्ग बंद राहतील.
3. गजानन महाराज मंदिर चौक: पटियाला बैंक, जवाहरनगर पोलिस ठाणे, आदिनाथ चौक, त्रिमूर्ती चौक, सेव्हन हिल्स उड्डाणपूल बंद.
4. कोकणवाडी चौक: पंचवटी चौक, विट्स हॉटेल, एसएससी बोर्ड व जिल्हा न्यायालय ते कोकणवाडी चौक बंद.
5. गुलमंडी: पैठण गेट, औरंगाबाद बुक डेपो, बाराभाई ताजिया, सिटी चौक, औरंगपुरा ते बाराभाई ताजिया मार्ग बंद.
हे आहेत पर्यायी मार्ग :
1. टीव्ही सेंटर चौक: कलेक्टर ऑफिस ते एन-१२ मार्ग उपलब्ध.
2. हडको कॉर्नर: एन-१२, साठे चौक ते दिल्ली गेट मार्ग वापरा.
3. सेव्हन हिल्स: सेंट्रल नाका ते बळीराम पाटील स्कूलमार्गे मार्ग खुला.
4. शरद टी पॉइंट:जिजाऊ चौक ते एम-२ कडे जाणारा मार्ग उपलब्ध.
5. कॅनॉट प्लेस: एन-१ चौक ते नोमीट नॉन हॉटेल चौक मार्ग वापरा.
6. गजानन महाराज मंदिर चौक: पतियाळा बँक ते विजयनगर, गजानन कॉलनी रिलायन्स मॉलमार्गे वाहन वाहतूक.
7. जवाहरनगर पोलिस स्टेशन: डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या मागील रस्त्याने त्रिमूर्ती चौकाकडे जाणारा मार्ग खुला.
8. कोकणवाडी चौक व परिसर:
– पंचवटी चौक ते कोकणवाडी चौक वाहने रेल्वे स्टेशनमार्गे.
– एसएससी बोर्ड ते कोकणवाडी चौक वाहने उस्मानपुरा व चुन्नीलाल पेट्रोल पंपमार्गे विट्स हॉटेल.
– वेदांतनगर ते कोकणवाडी चौक वाहन चालवण्यासाठी देवगिरी कॉलेज आयटीआय, पीरबाजार व उस्मानपुरामार्गे.
– सेशन कोर्ट सिग्नल ते कोकणवाडी चौक महावीर चौक मार्गे वाहन वाहतूक.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*