दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्ताची योजना आखली आहे. उत्सवाच्या ठिकाणी छेडछाड आणि वादाच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांसह “दामिनी पथक” तैनात करण्यात आले आहे. ३ पोलिस उपायुक्त, ६ सहायक पोलिस आयुक्त आणि १५०० पोलिस कर्मचारी या बंदोबस्तात सहभागी आहेत.

शहरातील संवेदनशील परिसरांमध्ये तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अत्यंत कडक बंदोबस्ताची आखणी केली आहे. यामध्ये शहागंज, निराला बाजार, एमआयडीसी वाळूज, टीव्ही सेंटर आणि किराडपुरा या ठिकाणी एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात केल्या आहेत.

ड्रोनच्या नजरांखाली दहीहंडी उत्सव

उत्सवाच्या मुख्य स्थळावर पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांसह एकूण १४०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या सोबतच ५०० होमगार्डचीही मदत घेतली जाईल. विशेष म्हणजे, मुख्य दहीहंडी स्थळांवर ५ ड्रोनच्या माध्यमातून पोलिस लक्ष ठेवतील, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये.

दुपारी ४ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असेल. या सर्व उपाययोजनांमुळे दहीहंडीचा उत्सव सुरक्षित आणि शांततेत पार पडावा, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

503 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क