छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन अल्ट्राव्हायोलेटने छत्रपती संभाजीनगरात आपल्या नवीन ‘यूव्ही स्पेस स्टेशन’ची सुरुवात केली आहे. तापडिया टेरेस, अदालत रोड येथे मंत्री परिवाराच्या माध्यमातून सुरू झालेल्या या केंद्रामुळे शहरातील दुचाकीप्रेमींना उच्च-कार्यक्षमता असलेल्या इलेक्ट्रिक मोटारसायकलींचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
डीलर मेसर्स आदित्य रायडर्स यांच्या भागीदारीत सुरू झालेले हे स्पेस स्टेशन ग्राहकांसाठी टेस्ट राइड, विक्री, विविध ॲक्सेसरीज आणि मर्चेंडाइजची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय शहरात स्वतंत्र समर्पित सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून विक्रीनंतरची सेवा दिली जाणार आहे.
या केंद्रात अल्ट्राव्हायोलेटच्या X-47 Crossover आणि F77 या परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटारसायकली ग्राहकांना पाहता व अनुभवता येणार आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, संबंधित पॉवरट्रेन 40.2 हॉर्सपॉवर आणि 100 Nm टॉर्क देते. ही मोटारसायकल 0 ते 60 किमी प्रतितास वेग अवघ्या 2.8 सेकंदांत गाठू शकते. 10.3 kWh क्षमतेच्या बॅटरीसह एका पूर्ण चार्जमध्ये 323 किमीपर्यंत IDC रेंज मिळते.
देशभरातील रिटेल आणि सेवा नेटवर्क मजबूत करण्याच्या कंपनीच्या धोरणातील हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ‘किल द पेट्रोल बिल’, टाइप-6 चार्जिंग नेटवर्कचा विस्तार आणि ‘बॅटरी फ्लेक्स’ यांसारख्या उपक्रमांद्वारे इलेक्ट्रिक मोबिलिटीचा वापर वाढवण्यावर कंपनी भर देत आहे.
अल्ट्राव्हायोलेटचे सीईओ व सह-संस्थापक नारायण सुब्रमण्यम यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येत आहे. नवीन स्पेस स्टेशनच्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञान, डिझाइन, परफॉर्मन्स आणि विक्रीनंतरची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘किल द पेट्रोल बिल’ उपक्रमांतर्गत जुन्या दुचाकीने मागील दोन वर्षांत कापलेल्या किलोमीटरच्या आधारे ग्राहकांना ₹30,000 पर्यंत लाभ मिळू शकतो. त्यामुळे इलेक्ट्रिक मोटारसायकल खरेदीसाठी ग्राहकांना अतिरिक्त प्रोत्साहन मिळणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*