छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर एसटी विभागातील तब्बल ३०७ बसेस कोकणातील गणेशोत्सवाच्या विशेष वाहतुकीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी स्थानिक वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. मुंबई, ठाणे, पालघर तसेच राज्यातील विविध भागांत नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमानी मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी आपल्या गावी रवाना होतात. त्यामुळे रेल्वे तसेच खासगी वाहतुकीवर मोठा ताण येतो. ही गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून दरवर्षी कोकणासाठी अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या जातात.

यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून ३०७ बसेस कोकणातील विशेष सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. विभागातील उपलब्ध बसेसपैकी मोठ्या संख्येने बसेस कोकणात गेल्याने ग्रामीण आणि स्थानिक मार्गांवरील नियमित फेऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपलब्ध बसेसचे फेरनियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्था करण्याचे आव्हान एसटी प्रशासनासमोर आहे.

दरम्यान, कोकणासाठी पाठविण्यात आलेल्या बसेसमध्ये सिडको ५१, मध्यवर्ती बसस्थानक ४५, पैठण ४२, सिल्लोड ४२, कन्नड ३८, गंगापूर ३४, वैजापूर ३१ आणि सोयगाव १६ बसेसचा समावेश आहे.

“प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेत प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात स्थानिक प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचे योग्य नियोजन केले जात आहे,” अशी माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

247 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क