छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट परिसरात सीम कार्ड खरेदी करण्यासाठी दुकानात गेलेल्या दाम्पत्याला चोरट्यांनी मोठा आर्थिक धक्का दिला. अवघ्या काही मिनिटांत दुचाकीवर ठेवलेली बॅग लंपास करण्यात आली. या बॅगेत सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजन आणि नवीन मोबाइल असल्याने चोरीच्या मुद्देमालाची किंमत जवळपास एक लाख रुपयांवर गेली आहे. ही घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
या प्रकरणी शेखर प्रदीप हिवराळे (२९, रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड, हसूल) यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हिवराळे हे आयटीआय कॉलेजमध्ये शिल्पनिदेशक म्हणून कार्यरत आहेत.
रक्षाबंधनानिमित्त पत्नी माहेरी गेल्याने हिवराळे त्यांना घेण्यासाठी गेले होते. पत्नीची बॅग घेऊन दोघे मुकुंदवाडीहून कॅनॉट परिसरात आले. रात्रीच्या सुमारास त्यांनी दुचाकीवर बॅग ठेवली आणि सीम कार्ड खरेदी करण्यासाठी जवळच्या दुकानात प्रवेश केला. काही वेळाने सीम कार्ड घेऊन बाहेर आल्यानंतर दुचाकीवरील बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बॅगेत २.७५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले, १.८४० ग्रॅमची सोन्याची कर्णफुले, सुमारे १० हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजन आणि २३ हजार रुपयांचा मोबाइल होता. अज्ञात चोरट्याने संधी साधून बॅग लंपास केली. या घटनेचा पुढील तपास हवालदार मंगेश पवार करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*