जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाने एक मोठे पाऊल उचलले आहे. व्हीआयपी दौरे, गर्दीच्या ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता असलेल्या परिस्थितीत आता विनापरवाना आढळणाऱ्या ड्रोनवर थेट कारवाई करण्यासाठी अद्ययावत ‘अँटी ड्रोन गन’ची चाचणी करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जिल्ह्यातील पोलिस आता हवेतच संशयास्पद ड्रोनवर नियंत्रण मिळवू शकणार आहेत.

शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर या नव्या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड व अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या उपस्थितीत हे तंत्रज्ञान सादर करण्यात आले. या चाचणीमुळे पोलिस दलाच्या क्षमतांमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे अधीक्षक राठोड यांनी सांगितले.

यासोबतच, जिल्हा पोलिस दलाला सात नवीन ड्रोनदेखील प्राप्त झाले आहेत. या ड्रोनमध्ये अत्याधुनिक एचडी स्पिकर आणि ३६० डिग्री सेन्सर आहेत. हे ड्रोन हवेतून जमावाला सूचना देण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तसेच, थर्मल लेन्सच्या साहाय्याने अंधारात देखील स्पष्ट चित्रीकरण करणे शक्य होईल.

अँटी ड्रोन गनच्या साहाय्याने पोलिसांना आता २ ते ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या ड्रोनवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. हे तंत्रज्ञान खास करून गर्दीच्या ठिकाणी किंवा व्हीआयपी दौऱ्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

जिल्ह्यातील पोलिस दलाच्या या नवीन तंत्रज्ञानामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होणार असून, जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत होईल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी  खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,031 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क