लाडकी बहीण योजनेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठामपणे उत्तर दिले आहे. “ही योजना फक्त रक्षाबंधन किंवा भाऊबीजेसाठी नाही, तर ती कायमस्वरूपी राबवली जाणार आहे,” असे त्यांनी नागपुरात आयोजित कार्यक्रमात सांगितले.
विरोधकांच्या टीकेवर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “विरोधक काहीही बोलतील, पण तुमच्यावर त्यांच्या बोलण्याचा प्रभाव पडू देऊ नका. ही योजना गोरगरीब महिलांना सशक्त करण्यासाठी आहे आणि ती चालूच राहील.”
योजना विस्ताराबाबत ते म्हणाले, “सध्या महिलांना 1500 रुपये मिळत आहेत, पण आम्ही येथे थांबणार नाही. तुमचा पाठिंबा राहिला तर आम्ही ही रक्कम 2500 ते 3000 रुपयांपर्यंत वाढवू.”
मुख्यमंत्र्यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची आकडेवारीही दिली. पहिल्या टप्प्यात 1 कोटी 7 लाख बहिणींच्या खात्यात 3,225 कोटी रुपये जमा झाले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात 52 लाख बहिणींना 1,562 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
शेवटी, मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले की, “या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींचा आकडा अडीच ते तीन कोटींपर्यंत पोहोचू शकतो आणि आम्ही त्यांना भरभरून मदत करू.”
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*