छत्रपती संभाजीनगर : राज्यभरातील रिक्षाचालकांनी विविध मागण्यांसाठी सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी रिक्षा बंदची हाक दिली आहे. अॅपवर आधारित बाइक टॅक्सी कायमस्वरूपी बंद करावी, बाइक टॅक्सी धोरण रद्द करावे आणि खासगी फिटनेस सेंटरची व्यवस्था बंद करावी, यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिकसह छत्रपती संभाजीनगरातही बंदचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरात बंददरम्यान सकाळी ११ वाजता महावीर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रीय ड्रायव्हर संयुक्त मोर्चा समितीचे अध्यक्ष सलीम खामगावकर यांनी ही माहिती दिली. तसेच परिवर्तन चालक-मालक संघर्ष कृती समितीच्या वतीने दुपारी २ वाजता आरटीओ कार्यालयावर घेराव घालण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शेख लतीफ यांनी सांगितले.

रिक्षाचालकांच्या म्हणण्यानुसार, खासगी दुचाकींमधून प्रवासी वाहतूक सुरू असल्याने नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. विमा, फिटनेस प्रमाणपत्र, ठराविक भाडेदर आणि इतर नियमांचे पालन रिक्षाचालकांना करावे लागते; मात्र बाइक टॅक्सीमुळे असमान स्पर्धा निर्माण होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

दरम्यान, दिवाळीच्या सुट्टीनंतर सोमवारपासून शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. काही संघटना विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू ठेवणार असून, काहींनी ती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी राष्ट्रीय ड्रायव्हर संयुक्त मोर्चा समितीतर्फे शहरातील रुग्णालय परिसरात ४५ रिक्षांच्या माध्यमातून सेवा दिली जाणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L3fP7E9DOigDdN0hpVeAGX?s=cl&p=a&iam=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

168 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!