mandatory-hsrp-number-plate-old-vehicles
जिल्ह्यातील जुन्या वाहनांनाही आता ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) लावावी लागणार आहे. ही नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाची विविध कामे थांबविली जातील. जिल्ह्यासाठी एजन्सी निश्चित करण्यात आली असून, वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून अपॉइंटमेंट घेऊन ही नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी केले.
जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी काही दिवसांपासून एजन्सी निश्चित होण्याची प्रतीक्षा होती. अखेर ही एजन्सी निश्चित झाली असून, आता जुन्या वाहनांना ही नंबर प्लेट लावण्याचे काम करण्यात येणार आहे.
ही नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे व उतरविणे, विमा अद्ययावत करणे इत्यादी कामे थांबविण्यात येतील, अशी माहिती विजय काठोळे यांनी दिली. कामानिमित्त एखादे वाहन शहरात वापरत असेल तरीही त्या वाहनाला सदर नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे. ही नंबर प्लेट बसविण्यासाठी काही तक्रार असल्यास पोर्टलवर अथवा आरटीओ कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे शुल्क:
४५० रु. – दुचाकी
५०० रु. – तीनचाकी
७४५ रु. – इतर सर्व वाहने
या पोर्टलवरून घ्या अपॉइंटमेंट:
https://maharashtrahsrp.com या पोर्टलवरून या नंबर प्लेटसाठी अपॉइंटमेंट घेता येणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*