tur-procurement-maharashtra-2025
राज्य सहकार पणन महासंघ आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात तूर खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, पाचोड, शिवना आणि विहामांडवा अशा ११ ठिकाणी ही केंद्रे सुरू झाली आहेत.
या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून तूर खरेदी १३ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी करताना सातबारा उतारा, पीक पेरा प्रमाणपत्र, आधारकार्ड आणि बँक पासबुक ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
जिल्हा पणन अधिकारी व्ही. यु. राठोड यांनी शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या हमीभाव योजनेअंतर्गत या खरेदी केंद्रांवर तूर खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची संधी आहे.
तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी असून, गहाळ न होता सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*