mass-copying-exposed-in-exam-center
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श सेकंडरी स्कूल, पिंपळगाव वळण (ता. फुलंब्री) येथे परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपीचा प्रकार सुरू असल्याचे जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी स्वतः उघड केले आहे.
आज 12वीच्या गणिताच्या पेपरवेळी हा प्रकार घडला. या परीक्षा केंद्रावर विकास मीना यांच्या पथकाने अचानक भेट दिली असता, सर्रास कॉपी सुरू असल्याचे आढळून आले.
“जेव्हा मी केंद्रात आलो, तेव्हा अनेक जण कॉपी पुरवत असल्याचे स्पष्ट दिसले. विशेष म्हणजे, या कॉप्या संस्थेतीलच लोक पुरवत असल्याचे समजले,” अशी माहिती विकास मीना यांनी दिली.
या कारवाईत मोठ्या प्रमाणात कॉपी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच शिक्षण विभागाला याची माहिती देण्यात आली आहे,” असे मीना यांनी सांगितले.
याप्रकरणी संस्थेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील परीक्षांमध्ये अशाप्रकारे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी विशेष पथके परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*
