Maratha-Reservation-Protest-Ends-With-Assurance

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समितीने छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात सुरू केलेले आंदोलन आज अखेर मागे घेण्यात आले आहे. मागील पाच दिवसांपासून रमेश केरे उपोषण करत होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी रात्री आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली होती. 

यावेळी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसमोर सादर करण्याची गरज असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. त्यानुसार, पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक होईल, असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.

आंदोलनामध्ये एकूण १४ मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मराठा आरक्षणाची अंमलबजावणी, ‘सारथी’मधील संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता, तसेच आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रमुख मागणी होती.

रमेश केरे यांनी हे आश्वासन मान्य करत उपोषण मागे घेतले असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसमोर मराठा समाजाच्या मागण्यांवर अंतिम निर्णय होणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,817 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क