आजचे राशीभविष्य 28 फेब्रुवारी 2025:
मेष (Aries): आज तुम्हाला अनेकांचे सहकार्य लाभेल आणि नवीन हितसंबंध निर्माण होतील. दिवस तुमच्या मर्जीनुसार जाईल.
वृषभ (Taurus): नवीन दिशा आणि मार्ग सापडेल. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या खेळकरपणात रमून जाल.
मिथुन (Gemini): घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवसभर कामात व्यग्र राहाल. सारखे मत बदलू नका; कामात एकसूत्रता ठेवा.
कर्क (Cancer): जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. भावंडांच्या सान्निध्यात रमून जाल. नवीन लोकांशी संपर्क होईल.
सिंह (Leo): मानसिक चंचलता जाणवेल. गोडाधोडाचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील.
कन्या (Virgo): दिवस घाईघाईत जाईल. घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. वैचारिक शांतता जपावी.
तूळ (Libra): आशावादी दृष्टीकोन ठेवावा. घरात तुमचे प्रभुत्व राहील. सर्व बाबी अभ्यासूपणे जाणून घ्याल.
वृश्चिक (Scorpio): संभाषणाची आवड पूर्ण कराल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत.
धनु (Sagittarius): योग्य तर्काचा वापर कराल. लहान प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील.
मकर (Capricorn): सामुदायिक वादात लक्ष घालू नका. जुनाट विचार करणे सोडून द्यावे. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल.
कुंभ (Aquarius): आपले प्रभुत्व दाखवाल. अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक स्थिरता ठेवावी.
मीन (Pisces): कागदपत्रांची नीट छाननी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. भागीदारीत खुश असाल.
टिप: राशिभविष्य आपल्या दिनचर्येत मार्गदर्शन करण्यासाठी आहे. तथापि, आपल्या निर्णयांमध्ये स्वतःचा विवेक आणि परिस्थितीचा विचार महत्त्वाचा आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*