मराठवाड्यात देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना अटक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहरातून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) शुक्रवारी रात्री ही मोठी कारवाई केली. या घटनेमुळे जालना आणि छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
NIA आणि ATSने रात्री एकाचवेळी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव या तीन शहरांमध्ये छापेमारी केली. छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौक आणि एन-६ परिसरातून दोघांना, तर जालन्यातील गांधीनगर भागातून एकाला अटक करण्यात आली. सध्या या तिघांच्या वास्तव्य असलेल्या ठिकाणांवर पंचनामा सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे आरोपी जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. या घटनेमुळे शहरातील मुख्य वसाहतींमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. NIA आणि ATSच्या या कारवाईनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*
संग्रहित फोटो