शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी मोठा निर्णय! कृषी उच्चतम बाजार समितीच्या आवारात २०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. समितीने यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष राधाकिसन पठाडे यांनी दिली.
मराठा मावळा संघटनेने कृषी उच्चतम बाजार समितीला शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारण्याची मागणी केली होती. मात्र निर्णय झाल्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने संघटनेने आंदोलन छेडले. अखेर संघटनेच्या अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सभापती पठाडे यांची भेट घेतली.
या वेळी वसतिगृहाच्या उभारणीसाठी काही विघ्नसंतोषी लोकांनी अडथळा आणल्याचे स्पष्ट झाले. मात्र तो अडथळा दूर झाल्याने आता लवकरच काम सुरू होणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
या वसतिगृहासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून १० कोटी रुपये खर्चून ते उभारले जाणार आहे. पुढील आठ दिवसांत भूमिपूजन होईल, असे अध्यक्ष राधाकिसन पठाडे यांनी सांगितले.
या बैठकीत पंढरीनाथ गोडसे, बाळासाहेब भुमे, संजय गायके, भरत कदम, कल्पना चव्हाण, सुनीता पाटील, विद्या मोहिते, गोपीशेठ निकम, विक्रम जिवरगे, आकाश वनारसे, नरहरी गोरे, अनिल आहेरवाड, विशाल येडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*