District Officials Inspect SSC Exam Centers for Fair Conduct

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात इयत्ता १० वीच्या परीक्षा सुरू असून, आज गणिताचा पेपर पार पडला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी फुलंब्री येथील संत सावता गुरुकूल विद्यालय परीक्षा केंद्राची संयुक्त पाहणी केली.

तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष केंद्राला भेट देत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा, परीक्षा कक्षातील व्यवस्थापन, पोलीस बंदोबस्त, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यांची तपासणी केली. तसेच परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपर सुरू असताना संपूर्ण वातावरणाची पाहणी केली. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविले जात असल्याने त्याच्या अंमलबजावणीचा आढावाही घेण्यात आला.

यानंतर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाथरी येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय येथे परीक्षा केंद्राची पाहणी केली. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी कोलते टाकळी येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथे भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान अधिकारीवर्गाने केंद्र प्रमुख व शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करून परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

735 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क