छत्रपती संभाजीनगर : शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहात राहणारी अनाथ पूजा हिचा विवाह अण्णासाहेब सातपुते या युवकाशी मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि त्यांच्या पत्नी करुणा स्वामी यांनी पूजाचे पालक म्हणून कन्यादान केले.

हा हृदयस्पर्शी विवाह सोहळा पुंडलिकनगर रोडवरील एन-४ येथील मंगल कार्यालयात पार पडला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, राज्यगृहाच्या अधीक्षक अपर्णा सूर्यवंशी आणि विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांनी विवाहाच्या तयारीत मोलाची भूमिका बजावली.

पूजा हिचे बालपण पैठण येथील बालगृहात गेले. १८ वर्षांनंतर तिला छत्रपती संभाजीनगर येथील सावित्रीबाई महिला राज्यगृहात आणण्यात आले. अण्णासाहेब सातपुते यांच्या कुटुंबाने राज्यगृहात तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव दिला आणि त्यांच्या पसंतीनुसार हा विवाह निश्चित झाला.

अण्णासाहेब सातपुते हे जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार नोंदणी केंद्रात व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत आहेत. पूजा हिने दहावी उत्तीर्ण केल्यानंतर फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

परंपरेनुसार विवाह सोहळा

आधी सोमवारी नोंदणी विवाह पार पडला होता, मात्र पारंपरिक संस्कार जपण्यासाठी शुक्रवारी विधीवत विवाह सोहळा आयोजित करण्यात आला.

“मला आता हक्काचे कुटुंब मिळाले आहे. यामुळे मी अतिशय आनंदी आहे,” अशी भावना पूजाने व्यक्त केली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,559 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क