छत्रपती संभाजीनगर : शहरात उन्हाच्या तीव्रतेत मोठी वाढ होत असून, गेल्या सहा दिवसांत दुसऱ्यांदा तापमानाने ३७ अंशांचा टप्पा गाठला आहे. शनिवारी (८ मार्च) शहरातील कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान आहे. विशेष म्हणजे, ३ मार्च रोजीही तापमान याच पातळीवर पोहोचले होते.
मार्चच्या प्रारंभीच उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरवर्षी मार्च अखेरीस उन्हाची तीव्रता वाढते, मात्र यंदा फेब्रुवारीच्या शेवटपासूनच तापमान चढू लागले आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळांमुळे रस्त्यांवरील वर्दळीवरही परिणाम होत आहे.
शहरातील तापमानाचा आलेख (अंश सेल्सिअस):
- ३ मार्च – ३७.०
- ४ मार्च – ३५.५
- ५ मार्च – ३४.४
- ६ मार्च – ३५.६
- ७ मार्च – ३६.२
- ८ मार्च – ३७.०
तापमान झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषतः दुपारच्या वेळी थेट उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि हलके व सुती कपडे घालण्याचा सल्ला दिला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*