छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना पदोन्नती मिळाली असून, त्यांची यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (दि. १०) बदलीचे आदेश जारी झाले असून, मंगळवारी (दि. ११) ते यवतमाळ येथे पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या जागेवर नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती अद्याप झालेली नाही.
तीन वर्षांचा यशस्वी कार्यकाळ
विकास मीना यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. आपल्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण विकासावर विशेष भर दिला. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात योगदान
ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अभ्यासिका सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला. तसेच, विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा
त्यांच्या या बदलीनंतर जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. नव्या जबाबदारीतही ते यशस्वी ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*