छत्रपती संभाजीनगर : नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात यंदा १ एप्रिलपासून करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, एप्रिल महिन्यात विविध परीक्षा असल्याने हे नियोजन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आता नेहमीप्रमाणे नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात जून महिन्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर इतर वर्गांच्या परीक्षा मार्चअखेरीस घेऊन १ एप्रिलपासून सीबीएसईच्या धर्तीवर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, संकलित मूल्यमापन चाचणी, पहिली ते नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा तसेच निकाल प्रक्रियेमुळे हे शक्य होणार नाही. त्यामुळे पुढील वर्षापासूनच १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली आहे.
यामुळे यंदाच्या वर्षी नेहमीप्रमाणे शाळा जून महिन्यातच सुरू होतील. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी याबाबत कोणत्याही संभ्रमात राहू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*