छत्रपती संभाजीनगर :  शहरातील उस्मानपुरा परिसरातील जडगाववाला ज्वेलर्स या सराफा दुकानात बनावट दागिने देऊन 2,16,335/- रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार 7 मार्च 2025 रोजी सायंकाळी 08:00 वाजण्याच्या सुमारास घडला होता, फिर्यादीने काही दिवसांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अखेर 16 मार्च रोजी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

कसा केला गेला गंडा?

फिर्यादी आकाश बाळकृष्ण दहिवाळ (वय 24, व्यवसाय – सेल्समन, रा. पैठण) हे 7 मार्च रोजी दुकानात काम करत असताना सायंकाळी एक अंदाजे 55 वर्षीय महिला आणि तिच्यासोबत 25 वर्षीय तरुण दुकानात आले. त्यांनी फिर्यादीकडे सोन्याच्या चेनची मागणी केली. फिर्यादीने त्यांना चार ते पाच प्रकारच्या सोन्याच्या चेन दाखवल्या. त्यातील एक 22 कॅरेट सोन्याची, 22.950 ग्रॅम वजनाची चेन पसंत केली, ज्याची किंमत 2,16,335/- रुपये होती.

संशयितांनी पैसे रोख देण्यास असमर्थता दर्शवली आणि जुन्या दागिन्यांची मोडतोड करून त्याऐवजी पैसे अदा करण्याचा प्रस्ताव दिला. फिर्यादीने त्यांचा विश्वास ठेवून त्यांच्या जुन्या दागिन्यांची देवाणघेवाण स्वीकारली. मात्र, जुन्या दागिन्यांची किंमत कमी पडत असल्याचे सांगितल्यावर आरोपींनी उर्वरित रक्कम भरण्यासाठी एटीएम मधून पैसे काढून आणतो असे सांगितले आणि दुकानातून निघून गेले.

थोड्या वेळाने फिर्यादीने त्यांच्या दिलेल्या जुन्या दागिन्यांची तपासणी केली असता ते खोटे आणि बनावट असल्याचे लक्षात आले. खरी सोन्याची चैन घेऊन दोघेही पसार झाले होते.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही दिवसांनी फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केली. 16 मार्च रोजी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे पुढील तपास करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू

घटनेनंतर पोलिसांनी जडगाववाला ज्वेलर्स आणि परिसरातील इतर दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून संशयित आरोपींची ओळख पटवण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,377 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क