छत्रपती संभाजीनगर : ३१ मार्च २०२५ रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद साजरा करण्यात येणार आहे. ईदनिमित्त शहरातील छावणी ईदगाह व रोजाबाग ईदगाह येथे मोठ्या संख्येने भाविक नमाज अदा करण्यासाठी एकत्र येतात. त्यामुळे या परिसरात प्रचंड गर्दी होत असते. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून काही महत्त्वपूर्ण वाहतूक बदल जाहीर करण्यात आले आहेत.

वाहतूक बंदीचे वेळापत्रक आणि मार्ग

पोलीस प्रशासनाने ३१ मार्च रोजी सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत काही मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मिलींद चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. तसेच, हडको कॉर्नर ते उद्धवराव पाटील चौक हा रोजाबाग ईदगाह कडील रोडचा एक भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग

•मिलींद चौकाकडून येणारी वाहने मिलकॉर्नर-भडकल गेट-टाउन हॉल उड्डाणपूलाखालून मकाई गेट- बेगमपुरा चौक मार्गे जाऊ शकतील.

•उद्धवराव पाटील चौकाकडून हडको कॉर्नरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी शासकीय दवाखान्याकडील रस्ता खुला राहील.

पोलीस बंदोबस्त अंतर्गत वाहतुकीचे नियमन आवश्यकतेनुसार करण्यात येईल. मात्र, पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अत्यावश्यक सेवांची वाहने यांना हा बंदी आदेश लागू राहणार नाही.

वाहतुकीच्या या बदलांचा सर्व नागरिकांनी सहकार्याने स्वीकार करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) धनंजय पाटील यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

914 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क