छत्रपती संभाजीनगर : शहरातील जाधववाडी परिसरात भरदिवसा रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला फक्त 12 तासांत अटक करत पोलिसांनी त्याची धिंड काढली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

जाधववाडी चौकात रस्त्याच्या कडेला रिक्षा उभी करून प्रवाशांची वाट पाहत असलेल्या संजय गायकवाड या रिक्षाचालकावर अचानक हल्ला झाला. जाधववाडी सिग्नलकडून आलेल्या कारने त्यांच्या रिक्षाला धडक दिल्यानंतर गायकवाड यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कारमध्ये बसलेला सय्यद फैजल उर्फ तेजा सय्यद एजाज या कुख्यात गुन्हेगाराने शिवीगाळ करत धारदार कोयता काढून संजय गायकवाड यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने संजय गायकवाड वेळीच सतर्क राहून त्या ठिकाणावरून पळून गेले आणि जीव वाचवला. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा आधार घेऊन सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे पथक तातडीने कार्यरत झाले आणि फक्त 12 तासांत सय्यद फैजलला अटक करण्यात आली. अटकेनंतर शहरभर त्याची धिंड काढून पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना शहरात थारा नाही.

पोलीस उपायुक्तांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले असून, अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,282 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क