छत्रपती संभाजीनगर : भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात संभाव्य ब्लॅकआउटसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासन ‘अलर्ट मोड’वर असून, ब्लॅकआउटची सूचना मिळाल्यानंतर पाच मिनिटांत संपूर्ण शहर अंधारात जाईल. या वेळी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ब्लॅकआउट संदर्भात सविस्तर चर्चा झाली. महत्त्वाच्या ठिकाणी सायरन कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी घरातील सर्व दिवे बंद ठेवावेत व बॅटरी, इन्व्हर्टरचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सतर्कतेसाठी विशेष उपाययोजना :

  • सर्व आवश्यक सेवांची यंत्रणा तपासण्यात आली आहे.
  • हॉस्पिटल्स, औषध साठा, अग्निशमन दल, पाणी व अन्नसुरक्षा यांची पूर्ण तयारी झाली आहे.
  • पोलीस विभाग सतर्क असून, सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
  • जायकवाडी धरण, वेरूळ, अजिंठा लेणी येथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सोशल मीडियावर प्रशासनाची नजर :
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सिनेमातील व्हिडीओ दाखवून भय निर्माण करणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध रहावे.

ब्लॅकआउटच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना :

  • ब्लॅकआउट दरम्यान शहरातील वीजपुरवठा पूर्णतः बंद केला जाईल.
  • सायरननंतर ५ मिनिटांत ब्लॅकआउट होणार.
  • नागरिकांनी शांतता पाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये.
  • प्रशासनाकडून मॉक ड्रिल नसली तरीही तीव्र सतर्कता बाळगण्याचे निर्देश.

प्रशासनाने संभाव्य परिस्थितीसाठी सज्जता ठेवली असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,664 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क