छत्रपती संभाजीनगर : बुधवारी दुपारी शहरात वादळवाऱ्यासह कोसळलेल्या जोरदार पावसामुळे विविध भागांत सहा ठिकाणी झाडे कोसळली. या दुर्घटनांमध्ये सेवा योजना कार्यालयासमोर एका झाडाखाली अडकून गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचा मृत्यू झाला. राजू भास्करराव चित्ते (वय ५३, रा. साई वृंदावन कॉलनी, पैठण रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

दुपारी सुमारे १ ते १:३० च्या सुमारास चित्ते हे आपल्या कारने (एमएच २० डीव्ही २६१३) भगवान महावीर चौकमार्गे घाटी रुग्णालयाकडे जात होते. त्याचवेळी अचानक वादळासह पाऊस सुरू झाला आणि शहरात विविध ठिकाणी झाडे कोसळली. बाबा पेट्रोल पंप चौक ओलांडून सेवा योजना कार्यालयासमोर पोहोचताच अचानक एक झाड त्यांच्या कारवर कोसळले. या अपघातात चित्ते गंभीर जखमी झाले.

स्थानिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत त्यांना कारमधून बाहेर काढले आणि घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रात्री नऊ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

राजू चित्ते हे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी घाटी रुग्णालयात नोकरीला असून मुलगा आयआयटी दिल्लीमध्ये शिक्षण घेत आहे. लहान मुलगी सातवीत शिकत आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,440 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क