छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या जायकवाडी धरणावर पुढील चार दिवसांसाठी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

जायकवाडी धरण परिसरात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली असून, धरणावर सायरन यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. आशिया खंडातील मातीच्या धरणांमध्ये अग्रस्थानी असलेले हे धरण संवेदनशील स्थळांपैकी एक मानले जाते.

चार दिवसांपूर्वी एसटीआयच्या विशेष पथकानेही धरणाला भेट देत सुरक्षा बाबत सविस्तर पाहणी केली होती. यानंतर प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत तातडीने पर्यटक बंदीचा निर्णय घेतला आहे.

जायकवाडी धरणावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपजिल्हाधिकारी निलम बाफना, तहसीलदार दिनेश झांपले यांनी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी नायब तहसीलदार राहुल बनसोडे, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

धरण परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,271 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क