छत्रपती संभाजीनगर : वाळू, खडी वाहतुकीसाठी १ हजार रुपयांची लाच ‘फोन-पे’द्वारे स्वीकारणाऱ्या शहर वाहतूक विभागातील सहायक फौजदार अशोक वाघ (वय ५६) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (१० मे) अटक केली. ही कारवाई सायंकाळी ६ वाजता हर्सूल टी पॉइंट परिसरात करण्यात आली.

३० वर्षीय तक्रारदाराचा खडी, वाळू, कच पुरवठ्याचा व्यवसाय असून त्यांचे वडील ट्रॅक्टरद्वारे बांधकाम साहित्य पोहोचवतात. मात्र, वाहतूक पोलिसांकडून सातत्याने अडवणूक केली जात होती व पैशांची मागणी केली जात होती. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक अमोल धस यांनी खातरजमा केली.

त्यानंतर फौजदार वाघ याने तक्रारदारास शनिवारी सायंकाळी हर्सूल परिसरात बोलावले. तेव्हा अंमलदार युवराज हिवाळे, राजेंद्र नंदीले, चांगदेव बागुल यांच्या उपस्थितीत सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने वाघ यांची भेट घेतली असता त्यांनी थेट ‘फोन-पे’वर १ हजार रुपये लाच पाठवण्यास सांगितले. पैसे मिळताच पोलिस निरीक्षक अमोल धस यांनी तत्काळ कारवाई करत वाघ याला अटक केली व त्याचा मोबाईल जप्त केला.

सेवानिवृत्तीस दीड वर्ष उरले होते

सहायक फौजदार अशोक वाघ यांना सेवानिवृत्तीसाठी अवघे दीड वर्ष शिल्लक होते. मात्र, पैशाच्या मोहामुळे त्यांना पोलिस कोठडीत जावे लागले. या प्रकरणामुळे वाहतूक विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे. हर्सूल पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,303 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क